रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून इनोव्हाची धडक ; एक महिला जागीच ठार पाचजण जखमी ; पुणे - बेगलोर महामार्गावरील भुयाचीवाडी येथील घटना
Raju Tapal
November 12, 2021
50
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून इनोव्हा कारने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले.
हा अपघात पुणे - बेंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे गुरूवार दि.११ नोव्हेंबरला सकाळी सात ते सव्वासात वाजण्याच्या दरम्यान झाला असून अपघातात ठार झालेल्या महिलेचे तसेच जखमींची नावे समजू शकली नाहीत.
कल्याण ,ठाणे येथून कोल्हापूरला निघालेली एम एच ०५ इ ए २६४२ या क्रमांकाची इनोव्हा आणि भुयाची वाडी येथील राजपुरोहित ढाब्यासमोर उभा असलेला एम एच १२ डी टी ०७७९ या क्रमांकाच्या टक या दोन वाहनांमध्ये अपघात झाला.
राजपुरोहित ढाबा येथे ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून बाथरूमला गेला होता.यावेळी साताराकडून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या इनोव्हाने पाठीमागून जोराची धडक दिली. या गाडीत सहाजण होते. त्यातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक महिला, १३ ते १४ वर्ष वयाच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या.
उंब्रज पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून जखमींना उपचारासाठी कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातील प्रवासी कल्याण,ठाणे येथील रहिवासी असल्याचे समजते.
Share This