रस्त्यात सापडलेले पाकीट केले परत
मनसे उपशाखा अध्यक्षाचा प्रामाणिक पणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वार्ड क्रमांक 10 चे उपशाखा अध्यक्ष मिलिंद ठाकरे यांना रस्त्याने जात असताना एक बेवारस स्थितीत पडलेले पाकीट निदर्शनात आले, सदर पाकीट तपासले असता त्यात अनेक प्रकारचे आवश्यक असणारे पेपर आढळून आले ,
मिलिंद ठाकरे यांनी तपासणी केल्यावर सदरील पाकीट हे वसई येथील राहणारे गणेश सावळाराम मेस्त्री यांचे नावाचे आहे.
त्या पाकीटामध्ये त्यांचे ओळख पत्र,चार एटीएम,लायसन्स आणि रोख रक्कम असे दस्तावेज आढळून आहे.
आज त्या अशोक नावाच्या सद्ग्रहस्तला संपर्क करून त्यांचे हरवलेले पाकीट त्यांना परत करून आपण एक जबाबदार नागरिक आहोत याचे प्रत्यय त्यांनी घडविले.