रस्त्यावर सापडलेले बँकेचे पासबुक, चेकबुक, गॅस बुक, रोख १० हजार रूपये असलेली पिशवी रांजणगाव गणपती ता.शिरूर येथील पोस्टमन बन्सीलाल जबा खुडे यांनी रांजणगाव गणपती पोस्ट कर्मचा-यांकडे प्रामाणिकपणे सुपुर्द केली.
केडगाव उपविभागातील रांजणगाव ते जी डी एस एम डी पोस्टमन बन्सीलाल जबा खुडे हे नेहमीप्रमाणे टपाल वाटपाचे काम बीटवरती करत असताना रांजणगाव गणपती जवळील देवाची वाडी परिसरात त्यांना बँकेचे पासबुक, चेकबुक, गॅस बुक, तसेच १० हजार रूपये रोख असलेली पिशवी रस्त्यावर सापडली.
सापडलेल्या पिशवीबाबत पोस्टमन श्री.बन्सीलाल जबा खुडे यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे त्यांनी सापडलेली पिशवी रांजणगाव गणपती येथील पोस्ट ऑफिस याठिकाणी घेवून आल्यानंतर
याबाबत खुडे यांंनी सर्व पोस्ट कर्मचा-यांना सांगितले.
पोस्ट कर्मचा-यांनी पिशवी तपासून पाहिली असता सदर पिशवीमध्ये केरभाऊ बापुराव दौंडकर , शेवंताबाई बापुराव दौंडकर यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व कॅनरा बँकेचे पासबुक, तसेच पिशवीतील रक्कम मोजून पाहिली असता १० हजार रूपये असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. तसेच पिशवीमध्ये कांदा बटाटा शेतमालाची पट्टी आढळून आली.
एका शेतक-याच्या कष्टाच्या घामाचे पैसे पोस्टमन श्री. बन्सीलाल जबा खुडे यांनी प्रामाणिकपणे परत करून डाकसेवा जनसेवा कार्य करून पोस्ट विभागाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल दौंडकर यांच्या वतीने करंजावणे ता.शिरूर येथील दत्तात्रय विठ्ठल वायदंडे यांनी शाल, श्रीफळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पोस्टमन श्री. बन्सीलाल खुडे यांना देवून खुडे यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्हा जी.डी.एस कामगार संघटनेचे माजी उपाध्यक्ष श्री.संजय गायकवाड , रांजणगाव गणपती येथील पोस्टमास्तर क्षीरसागर मॅडम, पंकज बांगर, बाबुराव शिंदे, अजय शेळके हे पोस्ट कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पुणे ग्रामीणचे अधिक्षक पी ई भोसले साहेब , केडगाव येथील सहाय्यक अधिक्षक भंडारी साहेब यांनीही प्रामाणिकपणाबद्दल पोस्टमन श्री.बन्सीलाल खुडे यांचे कौतुक केले.