• Total Visitor ( 84718 )

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला इको कारची धडक

Raju Tapal December 20, 2021 29

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला इको कारची धडक ; पिता पुत्र ठार 

 

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या इको कारने  धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिता पुत्र ठार झाल्याची घटना सोलापूर - पुणे महामार्गावरील  वडाचीवाडी येथे रविवार दि.१९ / १२/२०२१ रोजी सकाळी ६ वाजता घडली.

दीपक दगडू उबाळे, राहूल दीपक उबाळे दोघेही रा.चेंबूर मुंबई अशी अपघातात ठार झालेल्या पिता पुत्राची नावे आहेत.

इको कार क्रमांक एम एच ०४ डी के १११३ मधून देवदर्शनासाठी मुंबई येथुन देवदर्शनासाठी दीपक दगडू उबाळे,  राहूल दीपक उबाळे,अमोल दीपक पवार,  रा.मरळ, मुंबई, सुखदेव गजानन शिंदे रा.आंबेवाडी ठाणे असे चार जण निघाले होते. त्यांची इको कार मोहोळ तालुक्यातील वडाची वाडी हद्दीत आली असता निलकमल हॉटेल समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालट्रक क्रमांक  एम एच ११ ए एल ७१४९ ला  पाठीमागून जाऊन जोरात धडकली. यामध्ये दीपक दगडू उबाळे वय -५० यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांचा मुलगा राहूल दीपक उबाळे वय -२६ याचा  उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला.

त्यांच्यासोबत असलेले अमोल दीपक पवार वय -२६ यांची प्रकृती चिंताजनक असून चालक सुखदेव गजानन शिंदे हे ही जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल नाक्याच्या पेट्रोलिंग पथकाने जखमींना उपचारासाठी तात्काळ रूग्णवाहिकेतून सोलापूर येथे पाठविले. देवदर्शनासाठी निघालेल्या उबाळे पिताक्षपुत्राच्या दुर्दैवी मृत्यूच्या अपघाताची खबर सावळेश्वर टोलनाक्याच्या पथकाचे अमर डोंबे यांनी म़ोहोळ पोलिसांना दिली.

सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे अपघाताचा तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement