रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरूस्त टिप्परला आयशरची धडक ; २ ठार ४ जखमी
रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरूस्त टिप्परला पाठीमागून आयशरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार तर ४ जण जखमी झाले.
हा अपघात सिल्लोड -कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ शुक्रवारी दि.२२ ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास झाला.
कल्पनाबाई इमाजी पवार ,प्रशांत विठ्ठल वाघ अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे असून अपघातात जखमी झालेल्या चौघांची नावे समजू शकली नाहीत.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील रहिवासी आहेत.
पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना घेवून आयशर ट्रक पुणे जिल्ह्यातील बारामतीकडे निघाला होता. धानोरा फाट्याजवळ रस्त्यावर आयशरने नादुरूस्त टिप्परला मागून धडक दिली.
अपघातातील जखमींना सिल्लोड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलेले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहेत.