राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त डोंबिवली पश्चिम स्टेशननजीक त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण अर्पण करून त्यांच्या कार्याचा उजाळा देण्यात आला.या प्रसंगी पँथर आनंद नवसागरे(ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष),अनंत पारदुले (२७ गावे,विभाग प्रमुख कल्याण डोंबिवली ग्रामीणक्षेत्र),दामोदर काकडे (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,ब.स.पा.)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, व सावित्रीमाई फुले यांच्यासह महापुरुशांच्या विजयाचा जयघोष करीत सारा परिसर दणाणून गेला.प्रमुख नेत्यांची भाषणे झाल्यानंतर कार्यक्रमाचा सांगता समारोप करण्यात आला.याप्रसंगी रिपब्लिकन सेनेतर्फे परेश जोशी(विभाग प्रमुख,डोंबिवली पश्चिम),प्रदीप जगताप (डोंबिवली विभाग संघटक),युवराज वाटुरे(डोंबिवली शहर संघटक),तसेच बसपा तर्फे आशिष सोनवणे(डोंबिवली शहर अध्यक्ष),अशोक मोरे(संघटन प्रमुख),जयेश मोहिते(आय.टी.सेल प्रमुख),अशोक भोईर(डोंबिवली शहर उपाध्यक्ष),आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...!