• Total Visitor ( 369705 )
News photo

राऊतवाडी फाटा - कासारी फाटा रस्त्याच्या दुरूस्तीस सुरूवात

Raju Tapal May 14, 2022 67

राऊतवाडी फाटा - कासारी फाटा रस्त्याच्या दुरूस्तीस सुरूवात करण्यात आलेली आहे.

या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती.

हा रस्ता कासारी फाटा येथे पुणे - नगर महामार्गाला जोडलेला असून राऊतवाडी फाटा येथे शिक्रापूर -  मलठण रस्त्याला जोडलेला आहे.

राऊतवाडीच्या पुढे विरोळेवस्ती येथे शिक्रापूर - हिवरे रस्त्याला जोडलेला आहे. जातेगाव बुद्रूक येथे शिक्रापूर - पाबळ रस्त्यालाही जोडलेला आहे.

या रस्त्यावरून ताजणेवस्ती, राऊतवाडी, वाबळेवाडी, विरोळेवस्ती, पिंपळे धुमाळ,बुरूंजवाडी, गणेगाव खालसा, जातेगाव बुद्रूक ,  हिवरे या गावांकडे जाणारी येणारी वाहने ,दुचाकीचालक, प्रवासी प्रवास करत असतात.

या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी त्रस्त झाले होते.

या रस्त्यावरून प्रवास करणा-या प्रवाशांची होणारी कुचंबणा लक्षात घेवून शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी - पिंपळेधुमाळ रस्त्याची दुरवस्था या शिर्षकाखाली टिटवाळा न्यूजने १७/०३/२०२२ रोजी वृत्त प्रसारित केले होते.

टिटवाळा न्यूजने प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल घेवून  राऊतवाडी फाटा - कासारी फाटा या साडेतीन किलोमीटर रस्त्याच्या दुरूस्तीस सुरूवात करण्यात आलेली आहे.

रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर खडीचे ढीग टाकण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement