पुरोगामी विचारवंत रविंद्र चंदने श्रीसंत डेबूजी पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीत ज्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते ते मुरबाडचे भूमिपुत्र लेबरफ्रंट ठाणे /पालघरचे अध्यक्ष रविंद्र चंदने यांना गाडगेबाबा पुण्यस्मरण दिनी श्रीसंत गाडगेबाबा परिवार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व जय मल्हार आदिवासी विकास सेवा मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय श्री. संत डेबूजी भूषण पुरस्कार 2021 चा आदर्श समाजसेवक पुरस्कार मुथाळणे जुन्नर येथे समस्त वारकरी व पुरोगामी आंबेडकरवादी चळवळींच्या कार्यकर्तेच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी पुरोगामी प्रवचनकार वाबळे महाराज यांचे प्रवचन झाले त्यांनी बुद्धांच्या तत्वज्ञानापासून तुकाराम महाराज तसेच गाडगेबाबांच्या विचाराचा जागर केला. यावेळी बहुजन स्वरसम्राट सुप्रसिद्ध गायक मनोज गांगुर्डे याने गाडगेबाबांच्या जीवनावरील गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमास इतिहास संशोधक प्रा. शरद ताजणे सर, सरळगाव हायस्कूलचे शिक्षक प्रा. संजय इधे सर ऍडव्होकेट निखिल अहिरे व कार्यकर्ते उपस्थित होते सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजक लोकशाहीर भीमराव ठोंगिरे व चिमाजी ठोंगिरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास अथक मेहनत घेतली.