रायते-दहागांव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
देविदास सुरोशी यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार
कल्याण मुरबाड रॉड लागत असणाऱ्या रायते दहागांव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व मजबुती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरु असून सदरील कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे तसेच कामाचा दर्जा हा सुमार असल्याबाबत रायते येथील रहिवाशी देविदास शिवराम सुरोशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी अर्ज केला असून सध्य स्थितीत दहागांव जवळील एका मोरी सदृश्य पुलाचे काम हि निकृष्टच सुरूच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याबाबत देविदास सुरोशे यांनी ठाणे बांधकाम विभागाकडे तक्रार देऊन सदरील कामाबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असल्याचे टिटवाळा न्यूजशी बोलताना सांगितले. रायते-दहागांव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
देविदास सुरोशी यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार
कल्याण मुरबाड रॉड लागत असणाऱ्या रायते दहागांव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व मजबुती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरु असून सदरील कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे तसेच कामाचा दर्जा हा सुमार असल्याबाबत रायते येथील रहिवाशी देविदास शिवराम सुरोशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी अर्ज केला असून सध्य स्थितीत दहागांव जवळील एका मोरी सदृश्य पुलाचे काम हि निकृष्टच सुरूच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याबाबत देविदास सुरोशे यांनी ठाणे बांधकाम विभागाकडे तक्रार देऊन सदरील कामाबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असल्याचे टिटवाळा न्यूजशी बोलताना सांगितले.