• Total Visitor ( 368673 )
News photo

आंतरजातीय,आंतरधर्मीय,विवाह केलेल्या नवविवाहितांचा सत्कार 

Raju tapal January 27, 2026 89

आंतरजातीय,आंतरधर्मीय,विवाह केलेल्या नवविवाहितांचा सत्कार 

माईसाहेब आंबेडकर जयंती समारोहाचे औचित्य 

राजू टपाल.

टिटवाळा:- माईसाहेब आंबेडकर जयंती समारोहाचे औचित्य साधून आंतरजातीय,आंतरधर्मीय,विवाह केलेल्या नवविवाहितांचा सत्कार रविवार दिनांक ३१ जानेवारी सायंकाळी ४:३० वाजता कल्याण येथील काँ.दत्ता देशमुख सभागृह येथे करण्यात येणार आहे. डॉ. सविता भीमराव आंबेडकर तथा माईसाहेब आंबेडकर यांचा जन्म २७ जानेवारी १९०९ रोजी झाला होता. तर त्यांचा देहांत २९ मे २००३ रोजी झाला. त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्तिथी म्हणून लेखक व साहित्यिक विजय सुरवाडे तर प्रमुख वक्ते म्हणून सत्यशोधक शेतकरी सभा राज्य संघटक काँम्रेड किशोर ढमाले हे उपस्थित राहणार आहेत. 

सदरील कार्यक्रमाचे संयोजन भारतीय महिला फेडरेशन,कल्याण,समता संघर्ष संघटना,सकल भारतीय समाज,अंधश्रद्दा निर्मूलन समिती,राष्ट्रसेवा दल,ऑल इंडिया युथ फेडरेशन, श्रमिक मुक्ती दल, नागरी हक्क संघर्ष संघटना, ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉग्रेस(आयटक),अनुबंध,पुरोगामी विचारमंच,ऑल इंडिया स्टुडंट्स ऑर्गनायझेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) आहेत. 

सदर कार्यक्रमासाठी उदय चौधरी -९९६९५००३६१, बाबा रामटेके -८०९७५४०५०६, डॉ.सुषमा बसवंत -९८९२३८०४७३ किंवा विशाल जाधव यांच्या -९९६९३८०३६३ या नंबरवर संपर्क साधावा.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement