कोंढापुरी येथील पुलाच्या कठड्यांची दुरूस्ती करा
शिक्रापूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावापासून शिरूरच्या दिशेने १ किलोमीटर अंतरावरील पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. या पुलावरील लोखंडी पाईपच्या कठड्यांची दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने ब-याच वर्षांपासून केलेली नाही. या पुलाजवळचे दुभाजकही खराब झालेले आहेत. दुभाजकाची दुरूस्ती करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. कामिनी ओढ्यावरील हा पूल पुणे-अहिल्यानगर महामार्गावर असून पुलाजवळचां महामार्ग वळण रस्त्याचा तसेच चढ उताराचा आहे. या पुलावर ब-याच वेळा अपघात झालेले आहेत. श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती,रांजणगाव एम आय डी सी,शिरूर,न्हावरे,केडगाव,चौफुला,इनामगाव,मांडवगण फराटा,तांदळी,पारनेर,नारायण गव्हाण,सुपा,अहिल्यानगर,जामखेड,बीड,शनि शिंगणापूर,शिर्डी,मनमाड,राहुरी, कोपरगाव,श्रीरामपूर,छत्रपती संभाजीनगर,इंदौर,मध्यप्रदेश तसेच शिक्रापूर,चाकण,तळेगाव दाभाडे वडगाव मावळ,ठाणे, मुंबई,वाघोली,पुणे,भोर,कोल्हापूर या गाव शहरांकडे जाणा-या एस टी बसेस,ट्रक,टेम्पो मालवाहतूक करणारी वाहने तसेच प्रवासी या पुलावरील महामार्गावरून प्रवास करत असतात. या पुलावर ब-याच वेळा झालेले अपघात लक्षात घेवून पुलाच्या तुटलेल्या लोखंडी पाईपच्या कठड्यांची दुरूस्ती करणे अतिशय गरजेचे असून पुलाजवळील खराब झालेल्या दुभाजकाचीही दुरूस्ती करणे अतिशय गरजेचे आहे.