• Total Visitor ( 369928 )
News photo

तळेगाव ढमढेरे येथील खड्ड्यांची दुरूस्ती करा

Raju tapal November 30, 2025 52

तळेगाव ढमढेरे येथील खड्ड्यांची दुरूस्ती करा                                                                                         

शिरूर:- तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील खड्ड्यांची दुरूस्ती करा अशी मागणी तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी केली आहे. तळेगाव ढमढेरे हे शिरूर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले गाव असून राजकीय पुढा-यांची मांदियाळी असलेले गाव अशी ओळख तळेगाव ढमढेरे गावाची आहे. तळेगाव ढमढेरे येथील छत्रपती संभाजी महाराज मंगल कार्यालय समोरील वळण रस्त्यावर ब-याच दिवसांपासून मोठा खड्डा पडलेला आहे.

हा रस्ता शिक्रापूर येथील चाकण चौकात पुणे अहिल्यानगर महामार्गाला जोडलेला असून न्हावरे गावाकडे जाणारे प्रवासीही या रस्त्यावरून प्रवास करत असतात. छत्रपती संभाजी महाराज मंगल कार्यालयापासून हा रस्ता पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान खंडोबाची जेजुरी या गावाकडे तसेच पुरंदर तालुक्यातील सासवड, प्रसिद्ध देवस्थान नारायणपूर या गावाकडे तसेच भोर तालुक्यातील गावांकडे जात आहे. सध्या ऊस तोडणीचा  हंगाम सुरू झालेला असून छत्रपती संभाजी महाराज मंगल कार्यालयासमोरील वळण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनांची आदळ आपट होत असते. या खड्ड्यामुळे ऊस वाहतूक करणारी वाहने हेलकावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावरून पुणे ,वाघोली वरून येणारी पी एम पी एल एम बसही तळेगाव ढमढेरे येथील बाजार मैदानाकडे प्रवास करत असते. ही बस बाजार मैदानावरून शिक्रापूर,वाघोली ,पुण्याकडे प्रवास करत असताना या खड्ड्याचा अडथळा पी एम पी एल एम बसला पार करत मार्गक्रमण करावे लागते.

या खड्ड्याची त्वरीत दुरूस्ती करणे अतिशय गरजेचे आहे. दरम्यान तळेगाव ढमढेरे येथील स्मशानभूमीजवळून शिरूर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणा-या श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी गावाकडे जाणा-या रस्त्यावरही खड्डे पडलेले आहेत. गणेशमळा,माथेमळई,ढमढेरे वस्ती,विठ्ठलवाडी,पाठेठाण,राहू,पिंपळगाव,यवत या गाव,वस्तीकडे जाणा-या प्रवाशांना या खड्ड्याजवळ‌ वाहनांची वाट पाहात थांबावे लागते. पावसाळ्यात या खड्ड्यात पावसाचे दुषित पाणी साचत असते. या खड्ड्यात साचलेले पावसाचे दुषित पाणी वाहनांची वाट पाहात असलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडते.प्रवाशांची काळजी लक्षात घेवून तळेगाव ढमढेरे येथील स्मशानभूमीजवळील विठ्ठलवाडी कडे जाणा-या रस्त्यावरील खड्ड्याचीही दुरूस्ती करणे अतिशय गरजेचे असल्याचे तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी "टिटवाळा न्यूज"ला सांगितले.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement