शिक्रापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात
शिक्रापूर:- शिक्रापूर ग्रामपंचायत येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला
लाल रंग बलिदानाचा,पांढरा रंग सत्य आणि शांततेचा,हिरवा रंग मातीच्या नात्याचा या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच श्री रमेश गडदे यांच्या हस्ते ध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने" एकल महिला" या अभियानाचे स्वागत करून उपस्थितांना शपथ देण्यात आली तसेच भारत माता की जय,वंदे मातरम्,जय जवान,जय किसान,प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणांनी ग्रामपंचायत परिसर दुमदुमुन गेला. उपस्थितांमध्ये प्रामुख्याने उपसरपंच वंदना भुजबळ,सारिका सासवडे,पुजा भुजबळ,सुभाष खैरे,मयुर करंजे,पंचायत अधिकारी शिवाजी शिंदे,माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, उद्योजक दिपक भुजबळ,विलास जासुद गुरुजी,तलाठी शरद गाडे दादा, कृषी अधिकारी संध्या सांडभोर, प्रतीक्षा आठवले,जाधव सिस्टर पोलिस अधिकारी वर्षा कर्डिले त्याच बरोबर सर्व आशा सेविका,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.