रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 64 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न
कार्यकर्ता जगला पाहिजे,आणि तेवढ्याच जोमाने त्याने आंबेडकरी चळवळ पुढे नेली पाहिजे"हा निश्चय अंगी बाळगुन गावावस्त्यांवर,खेडोपाडी आंबेडकरी विचारधारा रामदासजी आठवले यांनी ज्या माध्यमातून पोहचवली तो पक्ष म्हणजे,"रिपब्लिकन पक्ष"
*महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या* खुल्या पत्रावर आधारीत असणाऱ्या
रिपब्लिकन पक्षाच्या 64 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देशभरात विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व उल्हासनगर येथे ही भव्य,मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या प्रमूख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली व इतर मान्यवर नेते मंडळी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला असल्याची माहिती
प्रल्हाद जाधव
जिल्हा अध्यक्ष कल्याण डोंबिवली
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी दिली.