रिक्षाने प्रवास करत असलेल्या महिलेचे दागिने लांबविणारे जेरबंद
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील पुणे - नगर.महामार्गावरून रिक्षाने प्रवास करणा-या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबविणा-या दोघांना रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी जेरबंद केले.
शाहरूख सलीमखान वय - २२ , हरीष किसन कोळपे वय - २१ रा.लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे अशी दोघा आरोपींची नावे आहेत.
जुनी सांगवी पुणे येथील जॅकलिन विल्सन कसोटे वय - २८ हे त्यांच्या नातेवाईकांसह २ जानेवारीला दुपारच्या सुमारास पुणे - नगर रस्त्याने एम एच १४ एच एम ८६२४ या क्रमांकाच्या रिक्षातून जात असताना कारेगाव येथील प्लेटोर सोसायटीसमोर पाठीमागून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दुचाकीस्वारांनी जॅकलिन कसोटे यांच्या गळ्यातील सोन्याचे अडीच तोळे वजनाचे सुमारे ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला होता.
कसोटे यांनी याबाबत रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
रिक्षाने प्रवास करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास या शिर्षकाखाली चोरीच्या या घटनेसंबंधी 'टिटवाळा न्यूज' ने दि.५ जानेवारी २०२२ रोजी वृत्त प्रसारित केले होते.
पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.