एस टी बसचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Raju Tapal
November 05, 2021
30
एस टी बसचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
जामखेड - पुणे एस टी बसचालकाने कडा बसस्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
बाळू महादेव कदम वय -३५ रा.आष्टी जि.बीड असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या एस टी बसचालकाचे नाव आहे.
बाळू महादेव कदम हे आष्टी आगारात ३ वर्षांपासून चालक पदावर कार्यरत असून ४ नोव्हेंबरला दुपारी आष्टी आगारातून कदम हे एम एच २० बी एल २०८६ या क्रमांकाची जामखेड पुणे ही एस टी बस घेवून निघाले होते. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान एस टी बसचालक बाळू कदम यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. चालक कदम यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे , वाहतूक नियंत्रक आलिशा बागवान, मुन्ना रावल, सुरेश खंदारे, तसेच वाहकाने कदम यांना तातडीने आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
एस टी बसचालक बाळू कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
Share This