• Total Visitor ( 84981 )

एस टी बसमधील बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

Raju Tapal October 27, 2021 38

एस टी बसमधील बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू ; अहमदनगर येथील एस टी बसस्थानकातील घटना

 

एस टी बसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर बसस्थानकातील पुणे बसस्थानकावर घडली.

प्रवाशाची ओळख पटलेली नसून अहमदनगर कोतवाली पोलीसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कोल्हापूर ते औरंगाबाद जाणा-या एस टी बसने प्रवास करणारा 30 वर्षीय अनोळखी प्रवासी अहमदनगर येथील पुणे बसस्थानकावर बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्या प्रवाशास अहमदनगर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

कोल्हापूर ते औरंगाबाद जाणारी एम एच 14 बी पी 3389 या क्रमांकाच्या एस टी बसने प्रवास करणारा 30 वर्षाचा अनोळखी प्रवासी अहमदनगर येथील पुणे बसस्थानकावर एस टी बस आली असता बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्या प्रवाशास    औषधोपचारासाठी  अहमदनगर जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते.तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले.

मृत व्यक्तीचे वर्णन याप्रमाणे ; 

उंची 5 फूट 6 इंच, रंग निमगोरा, शरीर बांधा पातळ, चेहरा उभट, ओठ काळसर, केस काळे बारीक, नाक सरळ, डोळे काळे, कपाळ अरूंद, ओठावर बारीक मिशी, अंगात पांढ-या रंगाचा ठिपके असलेला फुल बाह्याचा शर्ट, डार्क राखाडी रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे.

पोलीस या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोतवाली पोलीस ठाणे अहमदनगर 0241- 2416117 या फोन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अहमदनगर कोतवाली  पोलीसांनी केले आहे

Share This

titwala-news

Advertisement