साई समर्थ महिला बचत गट कुंभारखाण पाडा, नवापाडा, डोम्बिवली पश्चिम यांच्यावतीने नुकतेच हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला डोंबिवली चे सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे, कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या संकटात रिक्षावाल्यांना व अनेकांना अन्नधान्यापासून आर्थिक मदत करणारे प्रल्हाद म्हात्रे, सुप्रसिद्ध एडवोकेट प्रदिप बावस्कर,सुनीता कुटन, सदस्य महिला दक्षता कमिटी महाराष्ट्र पोलीस, साई श्रध्दा विविध कार्यकारी सेवा संस्था चे संस्थापक अध्यक्ष कैलास सणस आणि सचिव मिलींद काटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
बचत गटाच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
त्यावेळी प्रल्हाद म्हात्रे यांनी बचत गटातील महिलांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास, संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्याच बरोबर बचत गटामध्ये कर्ज घेतल्यानंतर आपली पत आणि प्रतिष्ठा संभाळून व्यवहार करण्याचे मार्गदर्शन केले. तर एडवोकेट प्रदीप बावस्कर यांनी महिलांना न्यायालयीन कार्यामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रातून काही सहकार्याची अपेक्षा असल्यास मदत करण्यासाठी मी सदैव तयार आहे असे सांगितले. सुनिता कुटन यांनी महिलांवर होणारे अत्याचारा बाबत मार्गदर्शन केले व महिला सबलीकरणासाठी बचत गटाचा वापर करून इतर महिलांनाही बचत गटांमध्ये घेऊन त्यांनाही मदत करावी असा संदेश दिला.
महिलांनी हळदी कुंकू तसेच वानाचे वाटप करून प्रत्येक महिलेला सुवासिनीचा मान देऊन सन्मानित केले.
यावेळी कार्यक्रमाला तब्बल १५५ महिलांनी सहभाग घेतला होता.
साई प्रसाद महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंदाकिनी जाधव आणि त्यांच्या सदस्य तसेच साई सद्गुरू कृपा महिला बचत गटाच्या अध्यक्षा गवळी आणि त्यांचे सदस्य सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष व बचत गटांचे प्रमुख मार्गदर्शक कैलास सणस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार माणून स्वागत केले.
सदर कार्यक्रम व्यवस्थित साजरा करण्यासाठी साई समर्थ महिला बचत गटाच्या अध्यक्षा कल्पना सूर्यवंशी, सचिव सरला अहिरे, खजिनदार वर्षा पाटील, यांच्याबरोबर यांना सहकार्य करणार्या कविता शिंपी, माळी व इतर अनेक महिलांनी सहकार्य केले. बचत गटाच्या सर्व महिला सदस्या सदर कार्यक्रमाला उपस्थित होत्या.