• Total Visitor ( 85004 )

समोरून येणा-या डंपरला ट्रकची धडक

Raju Tapal December 23, 2021 30

 समोरून येणा-या डंपरला ट्रकची धडक ; दोन चालकांचा मृत्यू 

भुसावळकडून जळगावकडे सुसाट वेगाने निघालेल्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणा-या  डंपरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन  परप्रांतीय चालकांंचा मृत्यू झाला. या अपघातात सहचालक जखमी झाला.

डंपरचालक ज्ञानप्रताप मेवालाल पटेल वय - ५८, टिकुरी समदन मेजा रोड, प्रयागराज उत्तरप्रदेश ,ट्रकचालक अयुब हुसेन सिद्दीकी रा.नंदासन मेहसाना गुजरात अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे असून  तौसिफ रसुलभाई कुरेशी वय - ३२ रा. नंदासन मेहसाना, गुजरात असे अपघातात जखमी झालेल्या सहचालकाचे नाव आहे.

जी जे ०२ झेड झेड २९२२ या क्रमांकाचा रिकामा ट्रक भुसावळकडून जळगावकडे सुसाट वेगाने निघाला होता. ट्रक रेल्वे उड्डाणपुलावर परिसरात असताना गोंभी ता.भुसावळ येथून आयुष प्रोकांत कंपनीसाठी खडी घेवून निघालेला डंपर क्रमांक एम एच सी वाय ५३२७ समोरून येत होता. बाजूच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक डंपरवर आदळला. 

गंगाराम राजाराम निषद यांच्या फिर्यादीनुसार चालक तौसिफ रसुल कुरेशी विरोधात बाजारपेठ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस निरीक्षक गणेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली.हवालदार गणेश चौधरी या अपघाताचा तपास करीत आहेत. 

Share This

titwala-news

Advertisement