संजय घुडे अष्टपैलू व्यक्तिमत्व, राज्य पुरस्काराने सन्मानित
प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने 2024 दिला जाणारा राज्य पुरस्कार हा,महामार्ग पोलीस सेवेत असलेले ठाणे परिक्षेत्रातील म.पो. केंद्र माळशेज येथील पोलीस अंमलदार संजय घुडे यांना प्रदान करण्यात आला आहे. संजय घुडे हे आपल्या नोकरी व्यतिरिक्त इतरही सामाजिक कार्य करत असतात. भजन, प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती. प्राणीमात्रांना मदत करणे, असाय पीडित यांना मदत करणे हे त्यांचे ध्येय आहे. व्यक्ती स्वतःसाठी तर जगतोच परंतु इतरांना जेव्हा मदत करतो त्यातच खरी मानवता दडलेली आहे, आणि हेच त्यांच्या जीवनाचे सार आहे.