सराई वाडीत आज सुध्दा दादागिरी चालू आहे
सराई वाडी आज सुध्दा दहशत चालू असून या वाडीचा निर्णय लवकरच लावला नाही तर येथील ग्रामस्थ आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत.
सराई वाडीत रविवारी सायंकाळी तहसीलदार संदिप आवारी यांच्या आदेशानुसार रस्ता शाप करण्यासाठी गाववाले अशोक सराई किरण सराई विजय सराई दिपक सराई भगवान सराई वसंत सराई व इतर ग्रामस्थ यांनी येथे ट्रॅक्टर लावले होते इतक्यात गुप्ता नावांचा मालक आला त्याने तेथे 70 वर्ष रहाणाऱ्या ग्रामस्थांना दमदाटी देण्यास सुरुवात केली आणि गाववाले यांना विचारणा सुरूवात केली की तहसीलदार यांचे आदेश दाखवा मी तुम्हाला रस्ता करून देणार नाही असे दमदाटी करत होता यामुळे येथील ग्रामस्थ भडकले असून या गुप्ता नावाच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अशोक सराई व इतर 32 कुटुंबांनी केली आहे.