• Total Visitor ( 84963 )

सराईत चोरट्याला पकडून पावणेदोन लाखाची चोरीची वाहने जप्त

Raju Tapal June 03, 2022 34

सराईत चोरट्याला पकडून भारती विद्यापीठ पोलीसांनी पावणेदोन लाखाची चोरीची वाहने जप्त केली.
सचिन सुरेश चिंतामणी वय ३७ रा.सच्चाई माता जैनमंदीर कात्रज पुणे असे पकडण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव असून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एक रिक्षा ,तीन दुचाकींचा समावेश आहे.
सराईत वाहन चोरटा सचिन चिंतामणी जैन मंदीर कात्रज परिसरात पांढ-या रंगाच्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अभिजित जाधव व विक्रम सावंत यांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक धीरज गुप्ता ,नितीन शिंदे ,पथकाने सापळा रचून चिंतामणी या आरोपीला ताब्यात घेतले.
     दुस-या चोरीच्या घटनेत वडगाव निंबाळकर येथे निवृत्त व्यक्तीकडील दीड लाखांचे दागिने लुटणा-या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलीसांनी अटक केली.
अबालू जाफर इराणी रा.शिवाजीनगर पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१७ फेब्रूवारी २०२२ रोजी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास वडगावमधील एक निवृत्त व्यक्ती फेरफटका मारत असताना आरोपीने पोलीस असल्याची बतावणी करत अंगावरील दागिने रूमालात बांधून ठेवण्यास सांगितले होते.हातचलाखी करत त्याने हे दागिने लंपास केले होते.
पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अशोक शेळके,  हवालदार महेंद्र फणसे सागर चौधरी, ज्ञानेश्वर सानप, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे अमोल भुजबळ, विलास ओमासे, राहूल होळकर यांनी आरोपीला पकडण्याची   कारवाई केली.

Share This

titwala-news

Advertisement