सराईत दुचाकी चोरास चोरलेल्या ४० दुचाकींसह जेरबंद करण्याची कारवाई शिक्रापूर पोलीसांनी केली.
अक्षय अनिल काळे वय २३ रा.बजरंगवाडी शिक्रापूर ता.शिरूर मूळ रा.साईनाथनगर चिंचोडीपाटील जि.अहमदनगर असे जेरबंद करण्यात आलेल्या दुचाकीचोराचे नाव असून त्याच्याकडे ४० दुचाक्या मिळून आल्या.
दोन दिवसांपूर्वी विकास पाटील व निखिल रावडे या पोलीस कर्मचा-यांना अक्षय काळे हा शिक्रापूर परिसरातून दुचाकी चोरून विकत असल्याची खबर मिळाल्यावरून पोलीस पथकाने त्याला जेरबंद केले. ४० पैकी ३० दुचाकी शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले असून या कामगिरीबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी ,पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे ( shedge ) यांनी विकास पाटील निखिल गावडे या पोलीस कर्मचा-यांचे अभिनंदन केले.