• Total Visitor ( 133517 )

सारडा महाविद्यालयात औषधी वनस्पतींची प्रदर्शनी

Raju Tapal March 01, 2022 68

सारडा महाविद्यालयात औषधी वनस्पतींची प्रदर्शनी

(वनस्पतीशास्त्र विभागाचा उपक्रम)

स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व लोकांपर्यंत औषधी वनस्पतींची माहिती पोहोचावी व त्याची ओळख व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते,   सदर प्रदर्शनीचे उदघाटन श्री. सारडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अमर सारडा, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. जगदीश सारडा व कार्ड संस्थेचे कार्यकारी श्री. विजयकुमार लाडोळे यांनी केले. या प्रसंगी आय.क्यू. ए.सी. चे समन्वयक डॉ. सत्येंद्र गडपायले, डॉ. श्रीराम जुमळे, गंगोत्री हेल्थ सेंटर व पत्रकार महेश बुंदे उपस्थित होते. वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांनी वनस्पती शास्त्र उद्यानामध्ये असलेली औषधी वनस्पती याची माहिती व अशा प्रकारच्या प्रदर्शनीमुळे औषधी वनस्पतींची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकते असे सांगितले. या प्रदर्शनीमध्ये जवळपास ४० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचे सादरीकरण केले यामध्ये अक्कलकाढा, इन्सुलिन प्लांट, समुद्रशोक, गुळवेल, गोकर्ण, शतावरी अडुळसा, पिंपरी काळमेध इतर औषधी वनस्पतींचे वेगवेगळ्या आजारावर काय उपयोग आहे हे सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शनीला भेट देऊन औषधी वनस्पतींची माहिती जाणून घेतली. सोबतच प्रदर्शनीला भेट देणाऱ्या लोकांचे औषधी वनस्पतीचे रोपे देऊन स्वागत करण्यात आले व परिसरातील औषधी वनस्पती लावल्यास त्याचा उपयोग कसा घेता येईल याची सुद्धा माहिती त्यांना देण्यात आली. प्रदर्शनीला लोकजागर संघटनेचे आनंद संग‌ई, लोकजागरचे सदस्य पतंजलीच्या सौ. संगीता मेन, सौ. बारब्दे, विद्यानिकेतन फार्मसी कॉलेज चे शिक्षक, विद्यार्थी, सारडा एज्युकेशन सोसाटीचे विश्वस्त श्री. संजय सारडा, श्री. अरविंद नळकांडे अध्यक्ष नोबेल पल्स फुड ग्रोअर्स सोसायटी दर्यापूर, अंजनगाव शहरातील पत्रकार व अंजनगाव शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी यांनी भेट दिली. प्रदर्शनीमध्ये  सादरीकरण करणाऱ्या मधुन  तीन उत्कृष्ठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या करिता परिक्षक म्हणून डॉ. सतीश मार्डीकर रसायनशास्त्र विभाग व डॉ. संगीता छाबा प्राणीशास्त्र विभाग यांनी कार्य केले. प्रदर्शनीच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. वशिष्ठ चौबे यांनी मार्गदर्शन केले तर विभाग प्रमुख डॉ. मंगेश डगवाल, शिक्षकेतर कर्मचारी श्री संतोष सरोदे, राजू भोबाळे व विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Share This

titwala-news

Advertisement