सरपंच ,सचिव च शाळेचा विकास करु शकतात.
संचिता महापात्र CEO जिल्हा परिषद अमरावती.
अमरावती - पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत लोणी टाकळी चे ग्रामपंचायत सरपंच, सचिव यांनी ज्या पद्धतीने शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचे माननीय संचिता महापात्र मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. लोणीचे सरपंच प्रतिक्षा आखरे व निलेश वाघ ग्रामपंचायत अधिकारी यांच्या नियोजनामुळे शाळेला उत्कृष्ट दर्जाची टेबल खुर्ची, मुलींचे शौचालय बांधून देण्यात आले. शौचालयामध्ये कमोड सीट, बेसिन तसेच सतत 24 तास पाणी पुरवठा देण्यात आला.
प्रवीण खांडेकर विस्तार अधिकारी शिक्षण यांनी 19 एप्रिल ला शाळेला भेट दिली. त्यावेळेस सर्व वर्गाची गुणवत्तेबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले व निरीक्षण करताना त्यांना नवीन बांधलेल्या शौचालयाकडे लक्ष गेले त्यांनी सरपंच तथा सचिव यांचे भरभरून कौतुक केले.
शालेय शौचालय नागरी सुविधा निधी 2024-25अंतर्गत 3, लक्ष रू काम आहे. त्यामध्ये 10%लोक वर्गणी गावा मधून जमा केली 30000/-रू पूर्ण काम 330000/-रू ग्राम पंचायत 15 वा वित्त अंतर्गत आरोग्य, शिक्षण, उपजीविका अंतर्गत लाकडी टेबल 10नग. ग्रामपंचायत स्व निधी 10% म. बा. क अंतर्गत 10खुर्ची देण्यात आल्यात.यावेळी डॉक्टर अरविंद मोहरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, बुद्धभूषण सोनवणे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक ,कल्पना वानखडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर तसेच डायटचे अधिव्याख्याता सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
यावेळी धीरज धावडे सहाय्यक शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा लोणी
यांनी आज पर्यंत ग्रामपंचायतने शाळेला केलेल्या आर्थिक सहाय्याबद्दल आभार व्यक्त केलेत.