गेली अनेक दिवस एस टी (लालपरी) चे कर्मचारी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाला बसले असून सदर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच बाबुभाऊ पाटे व त्यांचे सर्व सहकारी यांनी आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन (किराणा सामन छोटासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला..
सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात विचार आला की दिवाळी गेली पण त्यांच्या घरच्या दिवाळीच काय?
कितीतरी दिवस आंदोलनासाठी आपल्या भगिनी आणि बांधव रस्त्यावर आहे.
फुल ना फुलाची पाकळी म्हणून देण्याचा प्रयत्न केला.
आम्ही आणि तुम्ही समाजाची सेवा करतो बहीण भावा सोबत उभं राहणं हे प्रत्येक घरच्या माणसाचं कर्तव्य आहे.
अनेक सरकार आली अनेक गेली तुमचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे मी आज एक सामान्य नागरिक म्ह्णून मनोगत व्यक्त करतो.
तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या वेदनेची जाणीव झाली मदत म्हणा सेवा म्हणा भाऊ म्हणा त्या पद्धतीने मी काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला.
तुमच्या मागण्या ह्या शासनाने लवकर मंजूर केल्या पाहिजे.
लालपरी लवकरच रस्त्यावर धावली पाहिजे हे सर्वांचे मत आहे.
आज सर्व सामान्य माणूस आणि विद्यार्थ्यांचे जास्त प्रमाणात पैसे जात आहे त्यांच्या खिशाला देखील झळ बसत हवं हा ही विचार केला पाहिजे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे संवेदनशील व्यक्ती आहे नक्कीच लवकर मदत होईल व तुमच्या मागण्या मंजूर होईल ही आशा व्यक्त करतो.
तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल तेव्हा तेव्हा मदत करेल तुमच्या सोबत उभा असेल, सगळे सोबत असले की नक्कीच मार्ग निघेल अशी प्रामाणिक आणि तळमळीची भावना सरपंच बाबुभाऊ पाटे यांनी व्यक्त केली.
कर्मचारी बांधवांना किराणा किटचे वाटप केले.
सोबत माजी उपसरपंच संतोष दांगट, संतोष वाजगे,संतोष पाटे, आरिफ आतार, गणेश पाटे, अनिल खैरे, हेमंत कोल्हे, किरण ताजणे, विकासनाना तोडकरी, मयूर विटे, जालु खैरे,प्रशांत कदम, अक्षय वाव्हळ राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सभासद,ग्रामपंचायत कर्मचारी व एस टी कर्मचारी बांधव उपस्थित होते