मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वतीने राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात आला.
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचा-यांनीही आज कामबंद आदोलन केले.
राज्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांची सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्याची थकबाकी अदा करावी, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, शिक्षकेतर कर्मचा-यांची रिक्त पदे त्वरीत भरावीत ,सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारीत योजना लागू करावी या मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.