• Total Visitor ( 84848 )

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली

Raju tapal December 14, 2024 15

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली

अपोलो रुग्णालयात उपचार सुरू 

नवी दिल्ली:- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. अडवाणी यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांची प्रकृती गेल्या दोन आठवड्यापासून खूपच नाजुक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९७ वर्षे आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली असून त्यांना शनिवारी सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपोलोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. लवकरच मेडिकल बुलेटिन जारी केले जाईल. लालकृष्ण अडवाणी ९७ वर्षांचे असून ते गेल्या अनेक महिन्यांपासून आजारीच आहेत. गेल्या ४-५ महिन्यांत ही चौथी वेळ आहे की त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी २६ जून रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली. काही वेळाने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. लालकृष्ण अडवाणी हे गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयी समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळेच आजकाल ते त्यांच्या घरीच राहतात आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला येत नाहीत.

Share This

titwala-news

Advertisement