जेष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे निधन
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- पुण्यातील जेष्ठ पत्रकार रंगनाथ काशिनाथ माळवे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
दैनिक विशाल सह्याद्री मधून त्यांनी पत्रकारितेची सुरूवात केली.त्यानंतर दीर्घकाळ दैनिक प्रभात चे मुख्य उपसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले.
अनेक सदरांचे लिखाण दैनिक प्रभातमध्ये ते करायचे.
सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी "पाठीवर थाप पडलीच पाहिजे " हे त्यांचे दैनिक प्रभातमधील सदर विशेष गाजले.
पत्रकारितेतील योगदानाबद्दल पत्रकारितेतील महाराष्ट्र भूषण, पुणे रत्न अशा पुरस्कारांनी त्यांना गौरविले होते.१५ मे रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
राजकीय सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर)