मातंग समाजाचे जेष्ठ नेते मधुकर सुदाम गवळी यांचे निधन
अण्णाभाऊ साठे महामंडळ व मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण आणि मातंग समाज आरक्षण अयोग सदस्य असलेले तसेच कल्याण लाल चौकी अण्णाभाऊ साठे स्मारक विधाते कै.मधुकर सुदाम गवळी यांचे 15 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
कल्याण डोंबिवली क्षेत्रातील गरीब व कचरा वेचक कुटुंबांना सर्वतोपरी मदत करून समाजातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करून विविध मोर्चे आंदोलने इत्यादी माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी चळवळ उभारुन आपल्या समाजकारण व राजकारणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सामाजिक संघटनांचे व राजकीय पक्षाचे अनेक पद उपभोगली, त्यांच्या नेतृत्वात कचरावेचक कुटुंबाची स्वतंत्र वसाहत निर्माण करून त्या कुटुंबांना महानगरपालिकेच्या बीएसयूपी प्रकल्पाचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभा केला.
आज रोजी अनेक कुटुंब त्या इमारतीमध्ये राहत आहेत.
मातंग समाजाचे दिवंगत नेते बाबासाहेब गोपले यांच्यासोबत अनेक वर्ष त्यांनी काम केले,
डॉ.बाबासाहेब गोपलें साहेबांच्या नंतर समाजामध्ये मधुकर गवळी यांचे नेतृत्व उद्यास आले होते.
कै.मधुकर गवळी यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली असून कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजता समाजातील विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली वाहून कुटुंबांचे सांत्वन केले.
त्यांच्या जाण्याने समाज बांधवावर शोक कळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुना,नातवंडे, भाऊ, बहीण,पुतणे,असा मोठा परिवार आहे. लाल चौकी कल्याण येथील समशानभूमीत अत्यसंस्कार विधी करण्यात आले.