शहापूर नगर पंचायत नगराध्यक्ष पदी शिवसेना च्या सौ. गायत्री भांगरे तर उपनगराध्यक्ष पदी विजय भगत
शहापूर नगर पंचायत वर शिवसेनेने पुन्हा एकदा भगवा फडकवला असून नगराध्यक्षा पदी सौ. गायत्री भांगरे तर उपनगराध्यक्ष पदी विजय भगत हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या सदर च्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 10 उमेदवार तर भाजप चे 7 उमेदवार निवडून आले होते..
ठाणे जिल्हा ग्रामीण चे शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांनी सदर च्या निवडणुकीत कष्ट घेतलेल्या सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सदर यश संपादित करू शकलो असे म्हटलं आहे.. तमाम शिवसैनिकांचे गुरुवर्य म्हणून आनंद दिघे यांची आठवण प्रकाश पाटील यांनी उपस्थित केली. तर नवनिर्वाचित नगर पंचायत अध्यक्ष गायत्री भांगरे यांनी शहरातील प्रलंबित कामे आम्ही तत्पर मार्गी लावून सर्व सदस्य एकदिलाने काम करू असं म्हटलं आहे..
शिवसेना जिंदाबाद च्या घोषणेने संपूर्ण नगरपंचायत कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता..
यावेळी शहापूर चे मा. आमदार पांडुरंग बरोरा, शिवसेना तालुका अध्यक्ष मारुती धिरडे, वरिष्ठ नेते विठ्ठल भेरे, खाडे, तळपाडे सर आणि शेकडो शिवसैनिक हजर होते..