शक्तीवान भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
भाजपचे मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शकतीवान भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल होती. यात प्रामुख्याने सकाळीच त्यांनी रायते येथील गोशाळेत आपली तुला करून गोमातेला चारा दिला. तदनंतर दुपारी मधूबन सोसायटी येथे आयोजित नेत्र चिकित्सा शिबीर यशस्वी पार पडले तसेच असंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर दुपारी आदिवासी वस्तीवरील गोरगरीब महिला भगिनींना तब्बल अडीचशेच्या वर साडी वाटप केली. सायंकाळी वृक्षारोपण तर रात्री केक कापून सर्व मित्र मंडळी आप्तेष्टांना सस्नेह भोजन देऊन सर्वांच्या आलेल्या शुभेच्छा चा स्विकार केला. यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर,मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.