शेत आखाड्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ ; ४० तोळे चांदीचे दागिने लंपास
गंगाखेड येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत आखाड्यावर गुरूवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून ४० तोळे चांदीचे दागिने लूटून पलायन केले.
शेत आखाड्यावर झोपलेल्या अंबादास भिवराजी ठवरे वय - ५५ रा.आनंदवाडी ता.पालम यांच्यावर चार दरोडेखोरांनी कु-हाडीने वार केले. अंबादास ठवरे जखमी झाले.
नंतर अंबादास ठवरे यांच्या पत्नी पुष्पाबाई यांच्या अंगावरील ४० तोळ्यांचे चांदीचे दागिने सोन्याची पोत, कानातील दागिना असा ऐवज काढून घेवून पलायन केले.
पालम पोलीस चोरीच्या या घटनेचा तपास करत आहेत.