शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या ग्रंथपालाचा प्रामाणिकपणा
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात काही कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थाची सोन्याची अंगठी हरविल्यानंतर ती अंगठी ग्रामपंचायतीचे ग्रंथपाल संतोष काळे यांना सापडली.
सापडलेली अंगठी ग्रामपंचायतीचे ग्रंथपाल संतोष काळे यांनी पोलीसांच्या माध्यमातून मूळ मालकाला परत दिली.
संतोष राऊत हे ९ /१२/२०२१ रोजी काही कामानिमित्त शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालयात आले असताना त्यांच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी तेथे पडली.
ती सोन्याची अंगठी शिक्रापूर ग्रामपंचायतीचे ग्रंथपाल संतोष काळे यांना सापडली.
सापडलेली सोन्याची अंगठी संतोष काळे यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या ताब्यात दिली.
आपल्या अंगठीची ओळख पटविल्यानंतर सोन्याची अंगठी संतोष राऊत यांना परत देण्यात आली.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे ,पत्रकार रविंद्र पाटील तसेच ग्रामस्थांनी ग्रंथपाल संतोष काळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतूक केले.