शिंगवे ता.आंबेगाव येथील बेपत्ता झालेल्र्या चिमुकल्याचा मृतदेह गोबर गॅस टाकीत
Raju Tapal
November 09, 2021
40
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील गाढवे वस्तीवरील बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह मंगळवारी दि.९ नोव्हेंबरला सकाळी घराच्या पश्चिमेला असलेल्या गोबर गॅसच्या बंदिस्त टाकीत आढळून आला.
गाढवे वस्तीवरील विलास कुंडलिक गाढवे यांचा २ वर्षांचा मुलगा कृष्णा हा सोमवारी दि. ८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने बिबट्यानेच कृष्णाला पळविले असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात होता.
त्यानुसार वनविभागाच्या रेस्क्यू टीमने व स्थानिक तरूणांनी जवळपास सात ते आठ एकर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढले. परंतू कृष्णा सापडला नाही. सायंकाळी वनविभागाने शोधकार्य थांबवत त्यानंतर वनविभागाने पिंजरादेखील तेथे लावला. मंगळवारी दि.९ नोव्हेंबरला सकाळी पुन्हा स्थानिक तरूणांनी कृष्णाचा.शोध सुरू केला. त्यावेळी घराच्या पश्चिम दिशेला वैभव शिवाजी गाढवे यांना कृष्णाचा लाल रंगाचा टी शर्ट दिसला.
त्यावेळी जवळ जाऊन पाहिले तर कृष्णाचा मृतदेह फुगून वर आला होता. कृष्णाचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याची आई सविताने हंबरडा फोडला.मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
Share This