शिंगवे ता.आंबेगाव येथील गाढवे वस्तीवरून दोन वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता ; बिबट्याने पळविल्याचा ग्रामस्थांना संशय
Raju Tapal
November 09, 2021
33
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील गाढवे वस्तीवरून दोन वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता होण्याची घटना सोमवारी दि. ८ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
कृष्णा विलास गाढवे असे बेपत्ता झालेल्या २ वर्षाच्या मुलाचे नाव असून बिबट्याने पळवून नेल्याचा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करित आहेत.
वनविभागाने ऊसाच्या शेतात मुलाला शोधण्याची मोहीम सुरू केली आहे.
शिंगवे गावच्या उत्तरेला गाढवेवस्ती असून येथे राहाणा-या विलास कुंडलिक गाढवे यांचा दोन वर्षांचा मुलगा कृष्णा ओट्यावर खेळत होता. त्यानंतर तो साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या पूर्व दिशेला पाण्याच्या टाकीजवळ गेला असता अघानक बेपत्ता झाला.
कृष्णा दिसेना म्हणून त्याची आई सविताने इतर घरांमध्ये कृष्णाचा शोध घेतला परंतू कृष्णा सापडला नाही.
संपूर्ण मळ्यातील घरांमध्ये देखील कृष्णाला पाहिले. परंतू कृष्णा सापडला नाही.त्यानंतर कृष्णाला बिबट्यानेच पळवून नेल्याचा संशय बळावला.
विलास गाढवे यांच्या घरापाठीमागे रिकामे शेत आहे. त्या शेताच्या पलीकडे सर्व ऊसाची शेती आहे.
पोलीस पाटील गणेश पंडीत , नारायण गाढवे, प्रकाश गाढवे, नितीन वाव्हळ, नविनाताई गाढवे, यांनी वनविभाग व मंचर पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली.
दुपारी साडेबारा वाजता वनविभागाचे वनपाल विजय वेलकर, एन एम आरूडे, वनरक्षक पुजा पवार, डी एस शिवशरण, बीट अंमलदार कैलास कड,संपत भोर, शरद जाधव यांनी ऊसाच्या शेतात पाहणी केली. परंतू कृष्णाचा शोध लागला नाही.
Share This