शिर्डीहून शनिशिंगणापुरला जाणा-या वाहनाला अपघात ; ३ ठार
Raju Tapal
December 17, 2021
28
शिर्डीहून शनिशिंगणापुरला जाणा-या वाहनाला अपघात ; ३ ठार
गुहा ते चिंचोली दरम्यान गुरूवारी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान कंटेनर ,क्रुझर जीप, ,दोन दुचाकी या वाहनांमध्ये झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले.
जीपमध्ये शिर्डीहून शिंगणापूरला चाललेले भक्त होते.
शिर्डीवरून ९ भाविकांना घेवून एम एच २० एफ जी १४०१ या क्रमांकाची जीप शनिशिंगणापुरला चालली होती. कंटेनर क्रमांक एच आर ४५ बी ४४७० मनमाडच्या दिशेने चालला होता.
नगर मनमाड महामार्गावर सहापदरी रस्त्याचे काम चालू असल्याने गुहा येथे एका बाजूने रस्ता बंद करून.एकेरी वाहतूक चालू होती. जीप व कंटेनरची समोरासमोर धडक होवून कंटेनर व जीप रस्त्याच्या खाली उतरले.
कंटेनर जीपच्या धडकेत दोन दुचाक्या सापडल्या. दुचाकी क्रमांक एम एच १५ एच बी ९५७४ वरील एक जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला. जीपमधील सात जण मध्यप्रदेशमधील होते. पुष्पा जयस्वाल रा. सेलूल ,मध्यप्रदेश या अपघातात जागीच ठार झाल्या. इतर दोन मृतांची नावे समजू शकली नाहीत. जीपचालक रमेश घोडके मूळ रा.मठा जि.जालना हल्ली रा.शनिशिंगणापूर यांच्यासहीत जीपमधील पाचजण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी घटनास्थळी धाव घेवून चार रूग्णवाहिकेतून जखमींना राहुरी व नगर येथील खाजगी रूग्णालयात हलविले.
अपघातातील दुस-या घटनेत आरडगाव - मानोरी शिव रस्त्यावर दुधाचा टँकर पलटी होवून टँकरचालक किरकोळ जखमी झाला.
टँकर पलटी झाल्याने हजारो लिटर दूध वाया गेले.
एम एच १६ ए ई ५४२५ क्रमांकाचा दुधाने भरलेला टँकर दुध संकलन केंद्रातुन भरून ब्राम्हणी येथील दुध डेअरीकडे भरधाव वेगाने चालला असताना आरडगाव येथील साळूंके वस्तीशेजारी पलटी झाला. या अपघातात टँकरचालक किरकोळ जखमी झाला.
Share This