शिरूर तालुक्यातील कारेगाव येथून १६ वर्षीय युवक बेपत्ता
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथून १६ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली.
कारेगाव येथील सुयश सचिन पवार वय -१६ वर्षे हा मुलगा ४ मार्च रोजी क्लासला जातो म्हणून घरातून गेला. उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या आईवडिलांनी आजूबाजूला तसेच मित्र व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
याबाबत त्याचे वडील सचिन धनाजी पवार रा.करडेरोड, कारेगाव ता.शिरूर यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात खबर दिली.
बेपत्ता सुयश पवार यांचे वर्णन पुढीलप्रमाणे :- उंची ५ फूट ५ इंच, चेहरा उभट, बांधा सडपातळ, केस काळे, अंगात पांढ-या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँन्ट.
या मुलाबाबत कोणास काही माहिती असल्यास ९५५२५३७३८९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे तपास करत आहेत.