शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ए टी एम चोरीस
---------------------
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भरचौकात असणारे ए टी एम मशिन चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली.
मांडवगण फराटा येथे मुख्य चौकात असणारे ए टी एम काही दिवसांपूर्वी नव्यानेच बसविण्यात आले होते.
हे ए टी एम चोरीस गेल्याचे गुरूवरी सकाळी नागरिकांच्या लक्षात आले.
या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
काही दिवसांपासून मांडवगण फराटा येथील स्ट्रीट लाईट बंद आहे. बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. याचाच फायदा घेवून चोरट्यांनी ए टी एम मशीन पळविले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
या घटनेचा पुढील तपास मांडवगण फराटा येथील पोलीस करत आहेत.