शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी - पाटेठाण रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.
विठ्ठलवाडी हे गाव शिरूर तालुक्यात प्रतिपंढरपूर समजले जाते.
पाटेठाण हे गाव दौंड तालुक्यात आहे. पाटेठाण येथे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना असून शिरूर तालुक्यातील बरेच शेतकरी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला ऊस देत असतात. दौंड तालुक्यातील पाटेठाण, राहू,पिंपळगाव,खामगाव,हवेली तालुक्यातील हिंगणगाव, शिंदेवाडी, वाडेबोल्हाई,अष्टापूर, पिंपरी सांडस, सांगवी सांडस, , या गावांकडे तसेच साखर कारखान्याकडे जाण्यायेण्यासाठी विठ्ठलवाडी बंधा-याच्या रस्त्याचा वापर करत असतात.
पाटेठाण - विठ्ठलवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरमिश्रीत खडीने बुजवून खड्ड्यांची दुरूस्ती करण्याची अपेक्षा या रस्त्यावरून प्रवास करणा-या नागरिक ,प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे.