तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील त विविआनंदाश्रम शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ध कायर्क्रम पार पडले.
पुणे येथील समता शिक्षण संस्थेच्या वतीने तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील आनंदाश्रम शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिन कार्यक्रम घेण्यात आला.
समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रा.उषा वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी संजय मोरे उपस्थित होते.आनंदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा हातात घेऊन वैदवाडी ते आनंदाश्रम शाळेपर्यंत ढोल-लेझीम पथकाद्वारे रॅली काढून समता दिनाची जनजागृती केली. कोरोनाच्या काळातील दोन वर्षाच्या सुट्टीनंतर आनंदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथमच कार्यक्रम केला.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केला.यावेळी प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त,प्रसाद पवार यांचा पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल,सुमित गवारी याची कर्णावती युनिव्हर्सिटी गुजरात (गांधीनगर) येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल, तर आश्रम शाळेच्या माजी विद्यार्थिनी माधुरी अहिरे व जनाबाई राठोड उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळविल्याबद्दल या सर्वांचा समता दिनाचे औचित्य साधून मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी समता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जालिंदर अडसुळे उपाध्यक्ष मधुकर शिंदे, संचालक सुनील कामत,समन्वयक बुधा बिराडे, प्रा. रचना अडसुळे, प्रा.निशा भंडारे ,डॉ. चंद्रकांत केदारी,आनंदाश्रम शाळेचे मुख्याध्यापक अशोक वाडीले, वसतिगृहाचे अधीक्षक शंकर मुनोळी,विजया अहिरे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. प्रतिभा गवळी यांनी केले.