शिरूर येथील पाबळफाटा चौकाजवळच्या नगर - पुणे रस्त्यावर खड्डे
Raju Tapal
January 11, 2022
28
शिरूर येथील पाबळफाटा चौकाजवळच्या नगर - पुणे रस्त्यावर खड्डे
शिरूर येथील पाबळफाटा चौकाजवळच्या नगर पुणे रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
खड्डे पडलेल्या रस्त्याच्या समोरच शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी गाळे आहेत. नगर पुणे रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणारी वाहने आदळतात दुचाकी वाहने पंक्चर होतात.
या रस्त्यावरून शिरूर शहरात , शिरूर शहरातून कर्डे, आंबळे, न्हावरे, मांडवगण फराटा, सादलगाव, केडगाव, चौफुला, दौंड, बारामती, सुपे मोरगाव , सातारा तसेच पुण्याच्या दिशेने प्रवास करणारी वाहने प्रवास करत असतात.
रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे , तसेच खड्डे पडलेल्या या रस्त्याची दुरूस्ती होत नसल्याने वाहनचालक व प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
Share This