चां. ता. बोरा महाविद्यालयात सन २००४ च्या बी कॉमच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यात वॉटर फिल्टरची भेट महाविद्यालयास दिली .
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील बी.कॉम 2004 च्या बॅचचा तब्बल 17 वर्षांनी पहिला स्नेह संमेलन मेळावा झाला . यात ७० माजी विद्यार्थी सहभागी झाले.
यावेळी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माजी प्राचार्य नंदकुमार निकम प्राचार्य डॉ.के.सी. मोहिते उपस्थित होते . महाविद्यालयातील विविध कोर्सेस व उपक्रमांची माहिती प्राचार्य मोहिते यांनी दिली .प्रा डॉ पी एस वीरकर ,प्रा समाधान बोरसे ,प्रा सुनिता चौधरी ,प्रा डॉ रेणुका गायकवाड , हरिदास जाधव , प्रा चंद्रकांत धापटे ,प्रा . नारायण काळे ,आदी उपस्थित होते .
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयास वॉटर फिल्टर भेट दिला.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्नेह संमेलन मेळाव्याची आठवण म्हणून एक सन्मानचिन्ह भेट म्हणून देण्यात आले.यावेळी प्रा.दीपक गोरे, राहुल बोरा यानी मनोगत व्यक्त केले .प्रा. राजश्री नवले व विशाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले .
स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी महेश गंगावणे,प्रशांत शेटे, योगेश लांडे कल्पना मेढे ,किर्ती शिरस ,अलोक भंडारी,अमोल घावटे, महिंद्र वाखारे निखिल पारसवार,एकनाथ ढाके, अमोल काळे यांनी प्रयत्न केले . योगेश लांडे यांनी आभार मानले.