शैक्षणिक क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र सी टी बोरा कॉलेजचे केंद्र संयोजक प्रा .चंद्रकांत धापटे यांनी व्यक्त केले.
शिरूर येथील अभ्यास केंद्रावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.चंद्रकांत धापटे बोलत होते.
यावेळी प्रा हरिदास जाधव ,प्रा .डॉ . पी.एस.वीरकर ,प्रा .डॉ. विद्याधर औटी , प्रा विलास आंबेकर ,केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना धापटे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी अनेक महत्वपूर्ण धोरणांची आखणी करुन त्यांची अंमलबजावणी केली . चव्हाण यांचे नेतृत्व द्रष्टे व अभ्यासू होते .
सूत्रसंचालन व आभार प्रा. सतीश धुमाळ यांनी मानले.