शिरूर तालुका शिवसेना आयोजित शिवसंपर्क अभियान मेळावा सणसवाडी ता.शिरूर येथील भैरवनाथ मंदिर सभागृहामध्ये संपन्न झाला . अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सरचिटणीस अल्हाद महाजन होते अनिल काशिद यांनी प्रास्ताविक केले . धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आगमन होता त्यांचा सत्कार करण्यात आला .
सरचिटणीस महाजन यांनी शिवसेना प्रमुख व युवासेना प्रमुख यांचे ध्येय धोरणानुसार महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान सुरु असून पुढील येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या निवडणुकांचा विचार करून महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला कोठे किती बळ मिळते याची चाचपणी व शिवसैनिक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या अभियान मेळाव्याचे आयोजन असल्याचे सांगितले . नवीन मतदार नोंदणी, ई श्रमकार्ड , पिक कर्ज, विमा, कामगार मुलांची शिष्यवृती सुविधा विषयक माहीतीही महाजन यांनी यावेळी दिली . यावेळी दतोबा वाजे, विजय लोखंडे यांनी शासकीय कामे होणेसाठी नेत्यांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांना बळ देण्याची आवश्यकता व्यक्त केली . पोपट शेलार यांनी आभार मानले , युवा शाखा अध्यक्ष योगेश दरेकर यांनी केले . मेळाव्यास तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.