शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन
Raju Tapal
February 18, 2022
31
शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन
शिवसेनेचे जेष्ठ नेते , माजी मंत्री सुधीर जोशी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
सुधीर जोशी यांना सुधीरभाऊ या नावाने शिवसेनेत आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आदराचे स्थान होते.
एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे सहकारी होते.
सुधीर जोशी हे मनोहर जोशी यांचे भाचे. त्यांच्यामुळेच ते शिवसेनेत दाखल झाले.
सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. १९७३ मव्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले. १९६८ पासून ते विधानपरिषद सदस्य होते. १९९२ - ९३ या दरम्यान ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते.
युतीच्या पहिल्या सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूलमंत्री होते.
१९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत होते .
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अव्यक्ष, विमा कर्मचारी सेना अध्यक्ष , शिवाई सेवा ट्रस्ट विश्वस्त , बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना अध्यक्ष, महाराष्ट्र दूध वितरक सेना अध्यक्ष ही पदे सुधीर जोशी यांनी भुषविली.
Share This