शिवशाही बसची रिक्षाला धडक ; रिक्षाचालक जखमी
पुण्याहून बोरीवलीला निघालेल्या शिवशाही बसची पौड रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावरून उतरताना रिक्षाला धडक बसली. या घटनेत रिक्षाचालक रविंद्र आव्हाड वय - ४४ रा.दत्तवाडी , पुणे हा जखमी झाला.
या रिक्षामध्ये रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते.
बसचालकाने बस तशीच पुढे पिटाळली. प्रकाश नलावडे, महेंद्र कुसाळकर यांनी पौडफाटा ते शिवतीर्थनगर पर्यंत पाठलाग करत बस थांबविली.
जखमी रिक्षाचालकाला नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
कोरोनाच्या संकटातून वाचलो तर हे नवीन संकट आले. अजून रिक्षाचे कर्जपण फिटले नाही . हप्ते सुरू आहेत. त्यात हा अपघात झाल्याने माझ्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया रिक्षाचालक रविंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल यादव या घटनेचा अधिक तपास करत आहेत.