श्री.क्षेत्र वढू बुद्रूक येथे मुक पदयात्रेचे आयोजन
-----------------
धर्मवीर,छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी,३३४ व्या बलिदानदिनानिमित्त श्री.क्षेत्र वढू बुद्रूक येथे मंगळवार दि.२१ मार्चला सकाळी साडेसहा वाजता मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मृत्युंजय अमावस्येला श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथील धर्मवीर,छत्रपती श्री. संभाजीमहाराज समाधीस्थळ याठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून महाअभिषेक, मुकपदयात्रा, ज्वालांचे प्रस्थान, जिल्हाधिका-यांच्या हस्ते पुजा, ह.भ.प. शिरिषमहाराज मोरे देहूकर यांचे किर्तन , समाधीवर आकाशातून पुष्पवृष्टी, गृह विभागातर्फे शासकीय मानवंदना,व्याख्यान,सभा,,वितरण सोहळा, ऐतिहासिक महानाट्य असे विविध कार्यक्रम पार पडणार असल्याचे श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते,धारकरी सतिश दत्तात्रय गायकवाड यांनी स़ागितले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628