विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथे श्री पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक काळुराम गवारे शालेय समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
सामाजिक कार्यकर्ते भिवाजी गवारी,मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ,अरुण शिंदे,योगिता हरगुडे पी.बी.जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विद्यालयाचे शिक्षक अरुण शिंदे व मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनचरित्र यावेळी सांगितले.
पूर्वीच्या काळी जी दांभिकता होती समाजामध्ये भेदभावाची खूप मोठी दरी होती ती कमी करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. क्रांतीकारी विचारांनी राजर्षी शाहू राजांनी रयतेचे खूप मोठे कल्याण केले.
आपण देखील सामाजिक न्याय,समतेचा पुरस्कार केला पाहिजे, वागताना,वावरताना, बोलताना समत्वाच्या भावनेने, सामाजिक न्यायाच्या भावनेने सर्वांशी संवाद ठेवला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विद्यालयाचे विद्यार्थी प्रगती पायगुडे,अश्विनी सोनकांबळे, अविनाश वारकरी, ऋतुजा बर्डे, वैष्णवी गवारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.