श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान
Raju Tapal
June 21, 2022
31
तुळशी वृंदावन, दिंड्या पताका , ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष, टाळ मृदंगच्या तालावर विठुनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी देहू मंदीरात पादुकांचे पुजन आणि आरती केली.
आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार ,बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पुजेला उपस्थित होते.
यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहात होता.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थानचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वजण वारक-यांसह टाळ मृदंगाच्या गजरात दंग झाले होते.
महापुजेनंतर पालखीने मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे प्रस्थान केले.
Share This